अभ्यासयश कोर्स ( व्हिडीओ )

इ. ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी ताणमुक्त अभ्यास कसा करावा यासाठीच उत्कृष्ट कोर्स 

अभ्यासयश व्हिडीओ कोर्स ( पूर्व प्राथमिक )

विद्यार्थी मित्रानो आपण अभ्यास करतो म्हणजे नेमके काय करतो .? तर श्रावण, वाचन , लेखन आणि पाठांतर या ज्ञान घेण्याच्या प्रक्रिया करतो. पण हे प्रक्रिया कोण करत ..? तर आपण करतो..बरोबर ?

पण आपण म्हणजे कोण..? तर आपले मन हे काम करते आणि ज्ञान मिळविण्यासाठी हे मन मेंदू, शरीर आणि वातावरणाचा उपयोग करते. आता ह्या मनाचे काही गुणधर्म आहेत. म्हणजे जसे हवेचे , पाण्याचे गुणधर्म असतात तसे.

हे मन खूप शक्तिमान असले तरी ते सतत गतिमान असल्यामुळे आणि त्यामुळे खूप शक्ती खर्च करत असल्यामुळे ते एका विषयावर वा एका ठिकाणी बराच वेळ एकाग्र होऊ शकत नाही. जो पर्यंत मन एकाग्र होत नाही तोपर्यंत कोणतेही ज्ञान मिळविणे शक्य नाही. हे सिद्ध झाले आहे.

मन सतत गतीमध्ये असल्यामुळे आपले मन चंचल राहते, सतत विचार येतात आणि ताण वाढत जातो. यातून मग आपले अपेक्षित उद्दिष्ट साध्य न झाल्यामुळे अपयश येते आणि हे मन अधिकच निराश होते, त्यातून अभ्यासाचा कंटाळा येतो, आत्मविश्वास कमी होतो आणि निराशा येते.

आता या मनाला उभारी देऊन यशाकडे नेण्यासाठी त्या मनाचे नियम पाळणे आवश्यक आहे. केवळ 'मला अभ्यासात यश हवे असे वारंवार म्हणून ज्ञान मिळत नाही तर त्यासाठी मनाचे नियम पाळावे लागतात.मनाची शक्ती एकाग्र करण्याचा सर्वात पहिला आणि मुख्य नियम म्हणजे 'संकल्प" करणे होय.

हे सर्व व्हिडीओ पाहण्यापूर्वी सर्वात प्रथम संकल्प करा.  कोर्स सुरु करण्यापूर्वी एका ठिकाणी १० मिनिटे बसा, एखादी प्रार्थना-मंत्र म्हणा आणि "कोणत्याही परिस्थितीत मी माझा अवघड विषय सोपा करणारच आणि परीक्षेत यश मिळविणारच " हा संकल्प मनातल्या मनात ३ वेळा करा.

हा कोर्स शिकण्यास सुरुवात करा. हळूहळू तुमचे मन एकाग्र व्हायला लागेल .जसे जसे तुम्ही अभ्यासाची वेळ, दिशा, जागा आणि  नियम पाळत जाल तसे तसे अवघड विषय सोपा होत जाईल. आणि हे ज्ञान मनोबल तर वाढविलच पण मेंदूत खोलवर ठसेल आणि परीक्षेत उत्तमरीत्या आणि सहजपणे आठवेल.

हा कोर्स केवळ व्हिडीओ पाठ नसून मनाला वळण लावणारा , मेंदूची सुप्त यंत्रणा कार्यान्वित करणारा प्रोग्रॅम आहे. प्रत्येक व्हिडीओ पाहताना स्वतःच्या नोट्स काढा, जे कळले नाही ते परत पहा. सर्व व्हिडीओ एका दमात पाहू नका.

प्रयोग करताना मार्गदर्शन घ्या या कोर्समधील प्रत्येक प्रयोग केलाच पाहिजे असे नाही. उदा. आरोग्य विभागातील काही सामान्य औषधी घेताना देखील तज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच योग, ध्यान आणि अन्य उपाय करताना पालकांची मदत घ्यावी.

संपर्क : bhaskarayan66@gmail.com / ayurbrain@gmail.com / whatsapp : 9892807329 /

7 Video lessons